बेसन, तांदुळाची पिठी, हळद, तिखट, मीठ, धने जिरे पूड, लिंबाचा रस, गूळ हे सर्व एकत्र करून किंचित पाणी घालून एकजीव कालवून घ्यावे.
मिश्रण खूप पातळ नसावे.
मग अळूचे एक पान घेऊन त्यावर हे मिश्रम पूर्ण पसरवून लावावे.
त्यावर दुसरे अळूचे पान उलटे ठेवून त्यावर सुद्धा मिश्रण लावावे.
अशाप्रकारे ३-४ पाने एकमेकांवर ठेवून त्यावर पूर्ण मिश्रण लावून, त्याची घट्ट गुंडाळी करावी.
गुंडाळी करताना पण थोडे थोडे मिश्रण लावावे.
हि गुंडाळी प्रेशर कुकर मध्ये शिट्टी ना लावता १०-१२ मिनिटे वाफवावी.
त्यांनंतर बाहेर काढून, पातळ काप करून तव्या मध्ये थोडेसे तेल टाकून खरपूस शॅलो फ्राय करावी.
मग वड्यांवर भाजलेले तीळ व कोथिंबीर टाकून गरम गरम चहासोबत खायला द्यावे.
Comments on this Page
Amit via · Twitter Thank you for sharing this.. crispy and tasty recipe.
141 Days ago
Please share your comment on the post
Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.