कुकर रिंग व शिट्टी काढून बारीक गॅस वर गरम करत ठेवावा. तसेच कुकर मध्ये खाली एक भांडे पालथे ठेवावे.
साखर मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या.
तूप गरम करून, थोडे कोमट झाले कि त्यामध्ये बारीक केलेली साखर घालून छान फेटून घ्यावे.
मिश्रण छान एकजीव होऊन थोडे घट्ट होऊ लागले कि पाव वाटी दूध घालून पुन्हा चांगले फेटून घ्यावे.
मग त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर बेकिंग सोडा चमच्याने एकत्र करून, बारीक चाळणीने चाळून घालावा.
हे सर्व एकजीव होईपर्यंत नीट हलवावे.
मग त्यामध्ये पाव वाटी दूध घालून परत मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवावे.
खूप जोरात आणि जास्त फेटू नये, असे केल्यास केक हलका होत नाही.
मग ह्या मिश्रणाचे दोन भाग करून एका भागामध्ये हॉट चॉकलेट पावडर व २-३ चमचे दूध टाकून नीट मिक्स करून घ्यावे.
केक च्या भांड्याला तुपाचा हात लावून, त्यावर मैदा भुरभुरावा.
मग त्यामध्ये केकचे दोन्ही प्रकारचे मिश्रण एक-एक चमचा टाकत, भांड्यावर टिचकी मारत मारत पॅटर्न तयार करावा.
मग भांडे कुकर मध्ये ठेवून, बारीक फ्लेमवर केक ४०-४५ मिनिटे बेक करावा.
Comments on this Page
Please share your comment on the post
Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.