कढईमध्ये तूप घेऊन ते गरम झाले कि त्यामध्ये गव्हाचे पीठ घालावे. आणि ते मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजावे.
मग गॅस बंद करून त्यामध्ये पाव कप कोमट दूध घालून नीट मिक्स करून घ्यावे. गाठी होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
मग गॅस लो फ्लेमवर चालू करून, उरलेले १ कप दूध हळू हळू घालत मिश्रण सतत ढवळत राहावे.
साधारण ५ मिनिटांमध्ये व्हाईट सॉस चांगला घट्ट होईल.
मग त्यामध्ये कॉर्न, पालक, पनीर, मीठ, तिखट, मिरपूड घालून चांगले हलवून घ्यावे.
नंतर झाकण ठेवून ४-५ वाफा काढाव्यात आणि मग गॅस बंद करून किसलेले चीझ घालून नीट हलवून घ्यावे.
ब्रेडवरती हे मिश्रण पसरवून वर दुसरी स्लाइस ठेवून, तूप सोडून सँडविच सोनेरी रंगावर भाजावे.
हे सँडविच अतिशय रुचकर व पौष्टिक आहे.
Comments on this Page
Neerja via · Facebook This looks so yummy... I will try tonight itself.
141 Days ago
Please share your comment on the post
Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.