Easy Veg Cheese Sandwich - झटपट सोपे व्हेज चीज सँडविच
Publish Date: 2020-05-17By: Priyanka
prep time15 mins
cook time20 mins
total servings4 people
साहित्य
२ उकडलेले बटाटे
१ काकडी
२ टोमॅटो
२ कांदे
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून चाट मसाला
१/४ टीस्पून तिखट
१/४ टीस्पून मिरपूड
चीज स्लाइसेस
बटर
व्हीट ब्रेड
कृती
काकडी, गाजर, टोमॅटो, उकडलेले बटाटे ह्यांचे पातळ काप करून घ्यावेत.
तिखट, मीठ, चाट मसाला व मिरपूड एकत्र करून सँडविचसाठी मसाला तयार करावा.
मग ब्रेड च्या दोन स्लाईसेस घेऊन त्याला एका बाजून बटर लावून घ्यावे.
मग एका स्लाइसवर काकडीचे दोन व टोमॅटोचे दोन काप ह्याप्रमाणे पहिला लेअर बनवावा.
त्यावर थोडासा मसाला भुरभुरावा.
मग त्यावर कांद्याचे २ काप व बटाट्याचे दोन काप असा दुसरा लेअर बनवून मसाला भुरभुरावा.
त्यावर चीज स्लाइस ठेवून दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवावी.
एक पॅन गरम करून, त्यामध्ये बटर सोडून सँडविच दोन्ही बाजूने खरपूस भाजावे.
सँडविच भाजताना झाकण ठेवावे.
Comments on this Page
Please share your comment on the post
Your details are safe with us and only your message and First Name will be listed in Comments. Other details will only be used to contact you, if you mentioned it.