साहित्य
- १ वाटी हरभरा डाळ
- १ वाटी चिरलेला गूळ (डाळीपेक्षा किंचित जास्त)
- १ टीस्पून मीठ
- ३ चमचे गोडे तेल
- १/२ टीस्पून हळद
- ३-४ विलायची
- ३ वाट्या कणिक (साधारणपणे ४ साध्या पोळ्या होतील एवढी)
पुरण:
हरभऱ्याच्या डाळीत तिप्पट पाणी, अर्धा चमचा गोडे तेल, पाव टीस्पून हळद घालून, छोट्या कुकर मध्ये ५-६ शिट्ट्या करून डाळ मऊ शिजवून घेणे.
मग डाळ छान घोटून घेऊन त्यात चिरलेला गूळ, पाव टीस्पून मीठ घालून नीट हलवावे.
पुरण पूर्ण एकजीव होईपर्यंत नीट शिजवणे.
गॅस बंद करून त्यात विलायचीची पूड टाकावी.
कणिक:
कणिक घेऊन त्यात, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून मीठ व १ चमचा गोडे तेल घालून घट्ट मळून अर्धा तास ठेवावे.
मग एक वाटी पाणी घेऊन त्यात अर्धा टीस्पून मीठ विरघळवून, ते पाणी लावून लावून कणिक थोडी सैल करावी.
नंतर वरून दीड चमचे तेल टाकावे. आणि मग कणकेत पुरण भरून पुरणपोळ्या कराव्यात.
टीप: पुरणपोळ्या लाटताना वरून लावण्यास तांदुळाची पिठी वापरावी.

#Author, #Blogger, #Health #Lifestyle